नियोजन विभाग
विभाग प्रमुखाचे नाव | श्री. मधुकर देवडे |
पदनाम | मुख्य रचनाकार |
ई-मेल | cp@pcntda.org.in |
संपर्कक्रमांक | ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००५ Ext No. - १५०१ |
विभाग :-
प्राधिकरण क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी संपादनाखाली असलेल्या क्षेत्राचे 1 ते 42 सेक्टर व 4 मध्यवर्ती सुविधा केंद्र यामध्ये नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सेक्टर चे क्षेत्र साधारणत: 40 ते 50 हेक्टर इतके आहे.
प्राधिकरणाचे नियोजन विभागाकडून खालीलप्रमाणे कामे केली जातात.
- नियोजित बांधकामांना बांधकाम परवानगी, जोते तपासणी व बांधकाम पूर्णत्व/भोगवटा मंजूर करणे.
- विकास योजनेमध्ये झालेल्या बदलाच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये प्रस्ताव तयार करुन त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन प्रस्ताव शासन मान्यतेस सादर करणे.
- रेखांकन प्रमाणपत्र तयार करणे.
- प्राधिकरणाच्या विकास योजनेनुसार पेठांचे अभिन्यास तयार करुन मा. संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 115 नुसार मान्यता घेणे.
- प्राधिकरणाच्या सुधारीत विकास योजनेसंबंधीची कामकाज पाहणे.
- अतिक्रमण प्रकरणात झोनल अधिकारी यांनी अपेक्षिलेल्या माहितीबाबत मार्गदर्शन करणे व अभिप्राय देणे.