विकास प्राधिकरणाविषयी
पुणे शहराच्या हद्दीबाहेर पिंपरी चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांची कार्यक्षमता वाढण्यासाठी ,कारखान्यानजीक त्यांची निवासाची सोय होणे आवश्यक होते .या बाबी विचारात घेऊन पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ११३ (२) अन्वये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना दिनांक १४ मार्च १९७२ रोजी झाली .
उद्देश :
१. नवनगर उभारणीसाठी जमीन संपादन करणे . २. संपादित केलेल्या जमिनीचा नियोजनबद्ध व सर्वांगिण विकास करणे . ३. विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी , शैक्षणिक ,औद्योगिक ,वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करून देणे .