सामान्य प्रश्न

सामान्य प्रश्न

१. प्राधिकरणाकडून भूखंड / सदनिका कशी व कुणाकडून घेता येईल ?

प्राधिकरणाचे भूखंडाचे /सदनिकांचे वाटप ९९ वर्षांचे भाडेपट्ट्याने होत असते. प्राधिकरणाने भूखंड वाटपाबाबत जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर त्यानुसार अर्ज करण्यात यावा.प्राधिकरणाकडून भूखंड / सदनिका विकत घेण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक आहे .
अ. अर्जदार महाराष्टाचाह अधिवासी / महाराष्ट्रात जन्म झाला असल्याचा पुरावा /पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कामास असल्यास पुरावा .
ब. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्वतःच्या मालकीचे घर / सदनिका नसले पाहिजे .

२. प्राधिकरणाकडून भूखंड सदनिका धारकास भूखंड चा ताबा देणेसाठी काय कार्यपद्धती आहे ?

भूखंड / सदनिका धारकाने भूखंडाचे पूर्ण अधिमूल्य भरल्यानंतर भूखंडाचा भाडेपट्टा करण्यात येतो .

३ . भाडेपट्टा झाल्यापासून किती दिवसात प्राधिकरणाचे मिळकतीचे हस्तांतरण करता येते ?

भाडेपट्टा झाल्याचे दिनांकापासून ५ वर्षानंतरच मिळकतीचे हस्तांतरण करता येते .

४. भाडेपट्टा झाल्यापासून मिळकतीचे पाच वर्षाच्या आत हस्तांतरण कोणत्या कारणासाठी करता येते ?

भाडेपट्टा झाल्यापासून मिळकतीचे पाच वर्षाच्या आत हस्तांतरण पुढील कारणास्तव करता येते .
१) कर्ज बाजारीपणा / बँकेची जप्ती .
२) मूळ भूखंडधारक / सदनिकाधारक मयत झाल्यास.
३) भूखंड / सदनिका धारकाने वास्तव्यात बदल केल्यास.
४) कुटुंबातील व्यक्तीस गंभीर स्वरूपाचा आजार झाल्यास .
५) कुटुंबातील कर्त्याव्यक्तीस गंभीर अपघात झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास .

५. प्राधिकरणातील भूखंड / सदनिका त्रयस्थ व्यक्तींच्या नवे हस्तांतरण करताना काय कार्यपद्धती आहे ?

हस्तांतरणाबाबत मूळ भाडेपट्टा धारकांच्या नावे एक खिडकी योजनेअंतर्गत पुढील कागदपत्रांसह प्राधिकरण कार्यालयास अर्ज सादर करावा
१) भूखंड / सदनिका घेणाऱ्या व्यक्तीचा माहिती दर्शक अर्ज
२) भूखंड / सदनिका घेणाऱ्या धारकाचे फोटो असलेले ओळखपत्र
३) सदनिका धारकाने कर्ज उभारले असल्यास त्याबाबत वित्त संस्थेचे पत्र अथवा कर्ज उभारले नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र
४) अर्जदाराची छायाचित्रासह विहित नमुन्यातील माहिती
५) सदनिका धारक व मूळ भूखंड धारक यांच्यातील करारनाम्याची प्रत
६) सोसायटी नोंदणीचे प्रमाणपत्र व उपनिबंधकांनी मान्यता दिलेली सभासद यादी
७) संस्थेचे संमतीपत्र .(भूखंड सोसायटी मधील असल्यास )
८) स्त्री अर्जदाराबाबत नावात बदल झाले बद्दल प्रतिज्ञापत्रे किंवा महाराष्ट्र शासनाचे गॅजेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

६. शैक्षणिक ,वैद्यकीय / औद्योगिक / सार्वजनिक संस्थेसही भूखंड / सदनिका वाटप करण्यासाठी काय कार्यपद्धती आहे ?

प्राधिकरणाने भूखंड / सदनिका वाटपाबाबत जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर भूखंडासाठी अर्ज सादर करावा. अर्ज करणारी संस्था महाराष्ट्रात नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे . वैद्यकीय भूखंडाची अर्जदार यांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. या संधर्भात वेळोवेळी प्राधिकरण सभा धोरण निश्चित करेल असे नियम वाटपास लागू होतील .

७.वारसाचे नाव मिळकतीस लावणे साठी काय कार्यपद्धती आहे ?

एक खिडकी योजने अंतर्गत पुढील कागदपत्रांसह प्राधिकरण कार्यालयास अर्ज सादर करावा
१) वारसदाराचा एकत्रित विहित नमुन्यात अर्ज
२) मृत्यूचा मूळ दाखल
३) न्यायालयाचा वारस दाखला किंवा नोंदणीकृत मृत्युपत्र
४) भाडेपट्ट्याची साक्षांकीत प्रत
५) वारासदारांची साक्षांकित छायाचित्रांसह विहित नमुन्यातील माहिती
६) इतर वारसाचे ना हरकत प्रतिज्ञापत्र

८. कुटुंबातील व्यक्तीचे नाव समाविष्ट करणेबाबत काय कार्यपद्धती आहे ?

एक खिडकी योजने अंतर्गत पुढील कागदपत्रांसह प्राधिकरण कार्यालयास अर्ज सादर करावा
१) विहित नमुन्यातील अर्ज
२) ज्या सदस्याचे नाव समाविष्ट करायचे आहे त्यांचा महाराष्ट्रात जन्म झाल्याचा पुरावा अथवा अधिवास दाखला किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात काम करीत असलेल्या नोकरीचा दाखल < br> ३) कर्ज परतफेडीचा दाखला
४) कर्ज नसलेबाबत प्रतिज्ञापत्र
५) सर्व संबंधितांची ओळखपत्रे
६) अतजदाराची छायाचित्रासह विहित नमुन्यातील माहिती

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris