PIECC विभाग

विभाग :- PIECC (पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कनव्हेंशन केंद्र)

विभाग प्रमुखाचे नाव श्री. प्रभाकर वसईकर
पदनाम अधिक्षक अभियंता(अतिरिक्त कार्यभार)
ई-मेल ee@pcntda.org.in
संपर्कक्रमांक ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००६
Ext.No. १६०१

अधीक्षक अभियंता यांचे अधिपत्याखालील विभाग :

 1. स्थापत्य विभाग

पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कनव्हेंशन केंद्र (PIECC)

पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कनव्हेंशन केंद्राबाबत थोडक्यात माहिती

पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कनव्हेंशन केंद्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन केंद्र विकसित करण्याच्या हेतूने पुणे येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व कनव्हेंशन सेंटर उभे करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. यामुळे महाराष्ट्राचे व पुण्याचे नाव जागतिक स्तरावर स्थापित होणार आहे. पुणे आंतराष्ट्रीय प्रर्दशन केंद्र व कनव्हेंशन सेंटर केंद्राचे काम दि. 24/4/2012 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे मार्फत राबविण्याचे ठरले. त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन केंद्र उभे करण्याचे काम पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने काम हाती घेतले आहे. सदर प्रकल्पाच्या बृहत अाराखडयास शासनाने मान्यता दिली अाहे. या प्रदर्शन केंद्राची एकूण जागा सुमारे 94.87 हेक्टर इतकी आहे.

PIECC ची उद्दीष्टे

 1. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर विकसित करणे
 2. जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे स्थान उंचावणे व महाराष्ट्रातील उद्योगधंद्याचे बळकटीकरण करणे.
 3. व्यापार संवर्धनासाठी आणि सेवा उद्योगाची इको-सिस्टीम मजबुत करणे आणि रोजगाराच्या संधी वाढविणे.

PIECC प्रकल्पातील ठळक बाबी पुढील प्रमाणे:-

 • खुले प्रदर्शन केंद्र (98,000 sq.m)
 • बंदिस्त हॉल – ए (35,000 sq.m), हॉल – बी (35,000 sq.m) आणि संबंधित पायाभूत सुविधा.
 • बंदिस्त हॉल – सी (35,000 sq.m), व्यावसायिक केंद्र आणि संग्रहालय.
 • कनव्हेंशन सेंटर (5,000 व्यक्ती करता)

PIECC च्या मास्टर प्लॅनमध्ये खुले प्रदर्शन केंद्र, 3 प्रदर्शन हॉल, 5000 सीटचे कन्व्हेन्शन सेंटर आणि संग्रहालय, अग्निशमन केंद्र, प्रशासकीय इमारत, व्हीआयपी लाउंज, बस डेपो, बहुस्तरीय कार पार्क, व्यापारी केंद्र, हॅलीपॅड, मेट्रो स्टेशन, तारांकीत व बजेट हॉटेल, प्राथमिक शाळा, दवाखाने इ. समाविष्ट.

प्रकल्पाची सद्यस्थिती

 1. संपूर्ण प्रदर्शन केंदाच्या भूखंडास सिंमाभित बांधणे व 11 हेक्टर क्षेत्र सपाटीकरणाचे काम पूर्ण
 2. खूले प्रदर्शन केंद्रासाठी पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
 3. खूले प्रदर्शन केंद्र विकसीत करणे कामी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.
अनु. क्र. अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम
श्री प्रभाकर वसईकर अधिक्षक अभियंता / कार्यकारी अभियंता(अतिरिक्त कार्यभार)
श्री.भगवान घाडगे सहसंचालक वित्त (अतिरिक्त कार्यभार)
श्री अभिषेक देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी
श्रीमती दिपाली बो-हाडे वरिष्ठ लेखाधिकारी (अतिरिक्त कार्यभार)
श्री दत्तात्रय पवार शाखा अभियंता(अतिरिक्त कार्यभार)
श्री. सतीश लहाने सहाय्यक लेखा अधिकारी(अतिरिक्त कार्यभार)
श्री प्रकाश परदेशी सेवानिवृत्त

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris