नियोजन विभाग

विभाग :- नियोजन विभाग

1) विभाग प्रमुखाचे नाव श्री.सं. वि. कांबळे
2) पदनाम मुख्य रचनाकार(अतिरिक्त कार्यभार)
3) ई-मेल cp@pcntda.org.in
4) संपर्कक्रमांक ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००५
Ext.No. १५०१

विभागातील कामे :-

प्राधिकरण क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी संपादनाखाली असलेल्या क्षेत्राचे 1 ते 42 सेक्टर व 4 मध्यवर्ती सुविधा केंद्र यामध्ये नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सेक्टर चे क्षेत्र साधारणत: 40 ते 50 हेक्टर इतके आहे.

प्राधिकरणाचे नियोजन विभागाकडून खालीलप्रमाणे कामे केली जातात -

नियोजन विभाग

  अ .तांत्रिक शाखा

 1. प्राधिकरणाच्या विकास योजनेनुसार पेठांचे अभिन्यास तयार करुन मा. संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 115 नुसार मान्यता घेणे.
 2. विकास योजनेमध्ये झालेल्या बदलाच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये प्रस्ताव तयार करुन त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन प्रस्ताव शासन मान्यतेस सादर करणे.
 3. प्राधिकरणाच्या विकास योजना दुसऱ्यांदा सुधारीत करणेबाबत कामकाज पहाणे
 4. अतिक्रमण प्रकरणात झोनल अधिकारी यांनी अपेक्षिलेल्या माहितीबाबत मार्गदर्शन करणे व अभिप्राय देणे.

  ब .रेखाकला शाखा

 1. रेड झोनबाबतचे अभिप्राय देणे तसेच नकाशे तयार करणे .
 2. प्राधिकरणाच्या विकास योजनेनुसार भाग नकाशे व झोन दाखले देणे .
 3. बांधकाम परवानगी / पूर्णत्व नकाशांच्या सत्यप्रती संबंधितांना उपलब्ध करून देणे , तसेच गृहयोजनेतील नकाशे उपलब्ध करून देणे .
 4. विविध पेठांची रेखांकने तयार / सुधारीत करणे .
 5. विकास योजनेनुसार अभिप्राय देणे .
 6. भू विभागाकडून प्राप्त झालेल्या भूखंड /गाळा हस्तांतरण प्रकरणी जागा पहाणी करून अनधिकृत बांधकामाबाबत अभिप्राय देणे .
 7. या कार्यालयामार्फत राबविलेल्या गृहयोजना ,पेठांचे नकाशे ,बांधकाम परवानगी / पूर्णत्व दाखले ,मंजूर बांधकाम नकाशे इत्यादींच्या सत्यप्रती देणे .

  क .सर्व्हे शाखा

 1. रेखांकनाप्रमाणे निवासी , १२.५% भूखंड ,विविध आरक्षणामधील भूखंडाचे जागेवर भूविभागाचे मागणी प्रमाणे प्रत्यक्ष जागेवर सीमांकन करणे .
 2. सीमांकन झाल्यानंतर प्लेन टेबल शीट तयार करून त्याचे सीमांकन प्रमाणपत्र तयार करणे .
 3. पेठ निहाय ,भूखंड निहाय ,क्षेत्र नोंदी व भूखंड क्रं. वसलेवार पुस्तकात नोंदी घेणे .
 4. अतिक्रमण विभाग व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रत्यक्ष जागेवरील सर्व्हे नंबर निहाय व पेठ निहाय हद्दी दाखवणे .
 5. अभियांत्रिकी विभागास रस्ते तसेच खुल्या जागांचे रेखांकन नकाशाप्रमाणे सीमांकन देणे .
 6. भूखंड धारकास भाडेपट्टा नोंदविण्यापूर्वी प्रत्यक्ष जागेवर भूविभागाने कळविलेस जागा ताब्यात देणे .
 7. जोते तपासणी करणे
 8. भू विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपातील भाडे करारावर देणेत येणाऱ्या जागांचे संबंधितांना भू विभागाचे पत्रानुसार जागा ताब्यात देणे व पुन्हा ताब्यात घेणे
>
अनु. क्र. अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम
श्री.सं. वि. कांबळे मुख्य रचनाकार(अतिरिक्त कार्यभार)
श्री पी.जे. थोरात नगर रचनाकार
श्री धीरज प्रभू सहाय्यक नगर रचनाकार
श्रीमती प्रियंका रावसाहेब गायधनी सहाय्यक नगर रचनाकार
श्रीमती रेखा बोरुडे सहाय्यक लेखाधिकारी
श्री विठ्ठल गायकवाड कानिष्ठ अभियंता (स्थापत्य )
मुख्य आरेखक (अतिरिक्त कार्यभार)
श्री विकास वाघमारे कानिष्ठ अभियंता (स्थापत्य )
प्रमुख भुमापक (अतिरिक्त कार्यभार)
श्री सुनिल शेगर रचना / नियोजन सहाय्यक
परीक्षा भुमापक (अतिरिक्त कार्यभार)
श्री विश्वनाथ क्षिरसागर कानिष्ठ अभियंता (स्थापत्य )
भुमापक (अतिरिक्त कार्यभार)
१० श्रीमती उषा विशावासराव नियोजन सहाय्यक
११ श्री सत्येन शहारे कनिष्ठ लिपिक
१२ श्री नाना कांबळे नाईक
१३ श्री सुदाम केंजळे मजदूर
१४ श्री अंकुश हेंबाडे मजदूर
१५ श्री प्रकाश ढोरे मजदूर

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris