मागे

आमचे प्रकल्प

प्रकल्पाची उद्दीष्टे

" सर्वासाठी घरे " या अभियानाअंतर्गत परवडणारी घरे बांधणे.

पेठ क्र. १२ च्या आजूबाजूला औद्योगिक क्षेत्र आहे जवळ मोठमोठ्या कंपन्या असल्यामुळे येथील कामगारांकरिता घरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. याचा विचार करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) व अल्प उत्पन गटांतील घटकांसाठी (LIG) गृहनिर्माण योजना प्रस्तावित आहे.

किफायतशीर घरांबरोबरच पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्ते इ. सोयीसुविधा देण्यात येणार आहे.

गरज व आवश्यकता यांचे संतुलन साधून प्रकल्पाचे नियोजन, करण्यात आले आहे.

प्रत्येक घराची रचना हि वापरण्यासाठी सोयीची व सुटसुटीत ठरणार आहे. याकरीता PMAY च्या गाईडलाईन्स विचारात घेण्यात आल्या आहेत.